Loading...
मराठी English

शारीरिक व्यायाम (शारीरिक हालचाली)

शारीरिक व्यायाम (हालचाली) वृद्धत्वाशी कसे संबंधित आहे ?



  • निरोगी वृद्धत्वासाठी शारीरिक व्यायाम हा आहारा बरोबरच आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.
  • योग्य व्यायामासह पुरेशा पोषणामुळे सर्व वयोगटांमध्ये लक्षणीय आरोग्य फायदे असल्याचे नोंदवले गेले आहे.
  • स्वतःला शारीरिकरित्या सक्रिय ठेवल्याने तुम्हाला मधुमेह यांसारख्या स्थिती टाळण्यात किंवा नियंत्रित करण्यात, स्नायू आणि हाडांचे आरोग्य राखण्यास किंवा सुधारण्यास मदत होईल आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.
  • तथापि, वाढत्या वयानुसार एखाद्याला सक्रिय राहणे कठीण होऊ शकते. एखाद्याला तीव्र वेदना किंवा संधिवात यासारख्या काही व्याधी असू शकतात ज्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित होऊ शकते.
  • या व्यतिरिक्त, आवड नसणे, अपुरी जागा, वेळेची कमतरता, ज्ञानाचा अभाव किंवा गैरसमज ("जसे की घरगुती काम ही पण पुरेशी शारीरिक क्रिया आहे") यामुळे देखील संरचित शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष होऊ शकते.
  • अनेक धारणा देखील ज्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होऊ शकते ज्यात स्टिरियोटाइपिंग (जसे की 'वृद्ध लोक कमकुवत आहेत, त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे', 'व्यायाम तरुणांसाठी आहे'), कौटुंबिक दृष्टिकोन (जसे की आपले संपूर्ण कुटुंब लठ्ठ आहे, ते आपल्या कुटुंबात चालते त्यामुळे त्याचा उपयोग नाही, व्यायाम करणे आणि वजन कमी करणे म्हणजे पथ्ये), आणि पडण्याची/अपघाताची भीती समाविष्ट आहे.
  • शारीरिक हालचालींचा अभाव हळूहळू एखाद्याची कार्यक्षमता कमी करू शकते, एखाद्या व्यक्तीला विविध प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण करू शकते तसेच ती व्यक्ती कमजोर होऊ शकते.
  • नाजूक अथवा कमकुवत व्यक्तीला स्नायूंचे वस्तुमान कमी होते. नियमित शारीरिक हालचाली केल्याने स्नायू मजबूत होण्यास आणि स्वतंत्रपणे स्वतःचे काम करण्यास मदत होते. नियमित व्यायाम आणि शारीरिक क्रियाशील राहण्यामुळे संतुलन, समन्वय सुधारण्यास आणि वाढत्या वयाबरोबर सामान्यपणे होणारी संज्ञानात्मक घट (कॉग्निटिव्ह घट ) रोखण्यात मदत होते.

शारीरिक व्यायाम सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी

चालणे हा बहुतेक लोकांसाठी उपयुक्त व्यायाम आहे, त्याच्यापासून प्रारंभ करा.
चालणे हा अतिशय सुरक्षित व्यायाम आहे. अडथळा मुक्त, चांगला प्रकाश असलेली जागा निवडा.
तुमच्या टीव्ही मालिका पाहताना तुम्ही बसलेल्या स्थितीत सुद्धा विविध व्यायाम करण्याचा प्रयत्न करू शकता.
स्वत: ला सांगा, " ही शारीरिक हालचाल मला अधिक ऊर्जा देईल आणि माझा थकवा निघून जाईल."
हे खरे असू शकते, परंतु आपण थोडातरी वेळ काढण्याचा प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला निश्चितपणे कधीही वेळ मिळणार नाही.
कदाचित तुम्ही विचारले नसेल पण तुमचे शेजारी/सहकारीही इच्छुक असू शकतात किंवा तुम्ही एक ॲक्टिव्हिटी निवडू शकता ज्यामध्ये तुम्हाला स्वतःहून आनंद मिळतो.
असे अनेक उपक्रम आहेत जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात किंवा तुमच्या टेरेसवर कोणत्याही हवामानात करू शकता.
तुम्ही सोयीच्या ठिकाणी करू शकता असा उपक्रम निवडा. तुमच्या आजूबाजूला फिरा, घरी टीव्ही शो किंवा व्हिडिओ टेपसह व्यायाम करा. टीव्ही बघताना खुर्चीवर बसून करायचे व्यायाम शिकून घ्या.
व्यायामाला अधिक मनोरंजक बनवण्याचे काही मार्ग म्हणजे संगीत ऐकणे, सोबत्यासोबत व्यायाम करणे, ऋतूनुसार व्यायाम बदलणे, व्यायाम नसलेले उद्दिष्ट सेट करणे जसे की त्यादरम्यान दोन कामे करणे किंवा स्वतःला वेळोवेळी बक्षीस देणे.’
तुमचे वजन काहीही असले तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला सोयीस्कर असा एखादा व्यायाम निवडा, जसे की चालणे, खुर्चीवर बसून हालचाली इत्यादी.
प्रारंभ करण्यास कधीही उशीर झालेला नाही. वृद्धांसह कोणत्याही वयोगटातील लोकांना शारीरिक व्यायामाचा फायदा होऊ शकतो.
Image

मी व्यायाम कसा सुरू करू?



  • जुन्या सवयी बदला, नवीन, निरोगी सवयी लावा.
  • आपल्या कृतींबद्दल जागरूक व्हा. तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला जाणीव असेल तेव्हा तुम्ही ते बदलू शकता
  • योजना करा आणि रेकॉर्ड ठेवा. तुम्हाला काय बदलायचे आहे ते ठरवा, योजना करा आणि ते लिहा

तुमच्या कृती योजनेमध्ये, खालील गोष्टी समाविष्ट करण्याचे सुनिश्चित करा:

  1. काय ठरवले आहे ? (उदाहरणार्थ, चालणे किंवा स्नॅक्स टाळणे)
  2. किती ठरवले आहे ? (उदाहरणार्थ, ३-४ किमी चालणे)
  3. कधी करणार ते ठरवले आहे ? (उदाहरणार्थ, सोमवार, बुधवार, शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर)
  4. किती वेळा? (उदाहरणार्थ, 4 वेळा; "दररोज" हा शब्द टाळण्याचा प्रयत्न करा, जमेल तेवढेच करा )

उदाहरणार्थ: मी या आठवड्यात,

500 मीटर (किती?)
रात्रीच्या जेवणानंतर (काय?)
3 वेळा (सोमवार, बुधवार, शुक्रवार) चालण्याची योजना आखत आहे (किती वेळा?)

  • टीव्हीसमोर बसून जेवणे, खाणे यांसारख्या सवयी टाळा.
  • निरोगी सवयींबद्दल स्मरणपत्रे स्वतःला पोस्ट करा अथवा रोजच्या वावर असलेल्या ठिकाणी ठेवा' - रेफ्रिजरेटरवर, टेबलावर, तुमच्या कारमध्ये, आरशात, कुठेही !

सावधानता


  • सर्व हालचाली नियंत्रणाने हळूवार कराव्यात
  • उभे असताना, पाठीची नैसर्गिक कमान राखली पाहिजे
  • एकदम खूप व्यायाम करू नका , हळूहळू सुरुवात करून वाढवत जा
  • व्यायाम करताना नेहमी श्वास घ्या, तुमचा श्वास कधीही रोखू नका
  • व्यायाम सुरू करण्यापूर्वी थोडे वॉर्म-अप करा आणि व्यायाम संपवताना कूल डाउन सत्र करा
  • जर बसून व्यायाम करत असाल तर बसल्यावर खुर्चीच्या पाठीमागे काहीतरी दणकट टेकू द्या म्हणजे ती हलणार नाही
  • कोणताही आजार (हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाबाच), चक्कर येणे किंवा धाप लागणे, पाय किंवा घोट्याचे फोड /जखमा झाले , अलीकडील हिप/गुडघा रिप्लेसमेंट थेरपी ह्यामुळे व्यायाम करण्याची शिफारस केलेली नाही.
  • व्यायाम करताना काही अस्वस्थता असल्यास, थांबा आणि अस्वस्थतेची तक्रार डॉक्टरांना करा.

संतुलन राखण्याचे व्यायाम



संतुलन राखण्याचे व्यायाम का करावेत ?

शारीरिक संतुलन राखण्यासाठी संतुलन व्यायाम आवश्यक आहेत

जसजसे वय वाढते तसतसे मज्जासंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे संतुलन आणि चालण्यात फरक पडू शकतो

शिवाय, विशिष्ट संतुलन व्यायामामुळे पडण्याचा धोका कमी होण्यास, संतुलन सुधारण्यास, समन्वय सुधारण्यास आणि स्नायूंचे कार्य आणि संपूर्ण शरीराचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

वृद्ध लोकांमध्ये संतुलन गमावणे सामान्य आहे. यामुळे पडणे आणि चालताना अडचण येऊ शकते.

या सोप्या व्यायामाचा सराव केल्याने संतुलन सुधारेल आणि दैनंदिन जीवनातील क्रिया करताना अधिक आत्मविश्वास वाटेल.

किती वेळा करावे?

पाच वेळा (पुनरावृत्ती), प्रत्येकी किमान 3 संच, दिवसातून किमान 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी



Image
नोंद: खालील दिलेले सर्व व्यायाम सामान्य स्वरूपाचे आहेत, विशिष्ट आजारांसाठी योग्य व्यायाम जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

संतुलन सुधारण्यासाठी हलके व्यायाम

Random Image
सिंगल लेग स्टँड

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
  • आवश्यक असल्यास, आधारासाठी भक्कम खुर्ची किंवा भिंतीला पकडा.
  • एक पाय गुडघ्यात दुमडून पाय हळूहळू वर उचला जेणेकरून तुमच्या पायाचे तळवे आकाशाच्या दिशेने वर येतील. दुसऱ्या पायावर शरीराचा समतोल साधा.
  • ही स्थिती १०–२० सेकंद ठेवा.
  • हळूहळू पाय जमिनीवर परत ठेवा आणि दुसऱ्या पायाने हेच करा.
  • प्रत्येक पायावर २–३ पुनरावृत्त्या करा.

Random Image
मार्चिंग इन प्लेस

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
  • आवश्यक असल्यास, आधारासाठी भक्कम खुर्ची किंवा भिंतीला पकडा.
  • हळूहळू तुमचे वजन एका पायावर हलवा आणि दुसरा पाय थोडा उचला. तुमची शरीराची स्थिती संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • या स्थितीला २–३ सेकंद ठेवा, नंतर तुमचे वजन दुसऱ्या बाजूला हलवा आणि दुसरा पाय उचला.
  • प्रत्येक बाजूवर ३–५ पुनरावृत्त्या करा.
  • २–३ सेट्स करण्याचा प्रयत्न करा.

Random Image
वेट ट्रान्सफर

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
  • आवश्यक असल्यास, आधारासाठी भक्कम खुर्ची किंवा भिंतीला पकडा.
  • हळूहळू तुमचे वजन एका पायावर हलवा आणि दुसरा पाय थोडा उचला. तुमची शरीराची स्थिती संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • या स्थितीला २–३ सेकंद ठेवा, नंतर तुमचे वजन दुसऱ्या बाजूला हलवा आणि दुसरा पाय उचला.
  • प्रत्येक बाजूवर ३–५ पुनरावृत्त्या करा.
  • २–३ सेट्स करण्याचा प्रयत्न करा.



स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम



बळकटीचे व्यायाम का करावेत?

दैनंदिन जीवनातील क्रिया करण्यासाठी स्नायूंची ताकद आणि शक्ती आवश्यक आहे. स्नायूंमध्ये वय-संबंधित बदलांमुळे स्नायूंचे वस्तुमान आणि स्नायूंची ताकद कमी होते. म्हणजे, सारकोपेनिया होऊ शकतो.

सामर्थ्य वाढविण्याचे अथवा बळकटी वाढवण्याचे व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत जे स्नायूंची ताकद, गतिशीलता आणि कार्यप्रणाली सुधारण्यासाठी मदत करतात. येथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यायाम केल्यास त्रास होण्याचा कमीतकमी धोका असतो.

हे व्यायाम हाडांच्या वस्तुमानाची आणि सांध्याची लवचिकता वाढविण्यास मदत करते, स्नायू तयार करते आणि संतुलन सुधारते—दोन्ही सक्रिय राहण्यासाठी आणि पडणे टाळण्यासाठी महत्वाचे आहे.

ताकदीचे व्यायाम तुम्हाला स्वतंत्र राहण्यास मदत करतील आणि दैनंदिन व्यायाम सुलभ करतील, जसे की जार उघडणे, जिने चढणे, आणि सामान वस्तू उचलणे

किती वेळा करावे?

पाच पुनरावृत्ती, प्रत्येकी किमान 3 संच, दिवसातून किमान 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी.



Image

खांद्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम (अप्पर लिम्ब स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज)

Random Image
सीटेड शोल्डर अबॅडकशन

  • बसल्यावरती आपले पाय जमिनीवर समांतर टेकतील अशा मजबुत खुर्चीवर बसा.
  • पाय जमिनीवर समांतर ठेवून, पाठ ताठ आणि खांदे आरामात ठेवा.
  • हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवून आपले हात मांडीवर ठेवा.
  • दोन्ही हात हळूहळू खांद्याच्या सरळ रेषेत वर उचला. हात खांद्याच्या वर नेऊ नका.
  • तुमचे कोपर हलके वाकवलेले ठेवा आणि खांदे उचलू नका. या स्थितीत 1–2 सेकंद थांबा.
  • त्यानंतर, हळूहळू तुमचे हात खाली करा.
  • ही क्रिया 3–5 वेळा करा. असे 2–3 सेट करा आणि प्रत्येक सेट दरम्यान 30–60 सेकंद विश्रांती घ्या. तुम्हाला वेदना जाणवली तर थांबा आणि विश्रांती घ्या.
  • जर तुम्हाला आरामदायक वाटत असेल, तर या व्यायामामध्ये वजन वापरू शकता. अर्धा ते एक किलो वजन घेऊन सांगितल्याप्रमाणे व्यायाम करा.

Random Image
शोल्डर फ्लेक्सन

  • मजबूत खुर्चीवर सरळ बसा आणि तुमचे पाय जमिनीवर समांतर टेकवून ठेवा.
  • तुमची पाठ सरळ ठेवा आणि खांदे आरामात ठेवा.
  • आपले तळवे आतल्या बाजूने वळतील अशा पद्धतीने प्रत्येक हातात हलके वजन धरा. तुमचे कोपर 90 अंश वाकवा, ज्यामुळे तुमचे हात खांद्याच्या जवळ येतील.
  • दोन्ही हात हळूहळू वर उचलत रहा, जोपर्यंत ते डोक्याच्या वर पोहोचत नाहीत.
  • या स्थितीला 1-2 सेकंद थांबा, आणि नंतर हळूहळू तुमचे हात सुरूवातीच्या स्थितीत परत करा.
  • प्रत्येक सेटमध्ये 3-5 वेळा पुनरावृत्ती करा, 2-3 सेट्स करा आणि प्रत्येक सेट दरम्यान 30-60 सेकंद विश्रांती घ्या.
  • सर्व क्रिया सावकाश करा आणि त्या करत असताना श्वास स्थिर ठेवा— हात उचलताना श्वास घ्या आणि खाली करताना श्वास सोडा.

Random Image
शोल्डर श्रग्स

  • आपले तळवे आतल्या बाजूने वळतील अशा पद्धतीने प्रत्येक हातात हलके वजन धरा.
  • दोन्ही खांदे हळूहळू कानांच्या दिशेने शक्य तितके उचला, पण जास्त ताण न देता, हात सरळ आणि आरामदायक ठेवा.
  • ही स्थिती १-२ सेकंद ठेवा, नंतर हळूहळू खांदे खाली घ्या.
  • प्रत्येक सेटमध्ये 3-5 वेळा पुनरावृत्ती करा, 2-3 सेट्स करा आणि प्रत्येक सेट दरम्यान 30-60 सेकंद विश्रांती घ्या.
  • सर्व क्रिया सावकाश करा आणि त्या करत असताना श्वास स्थिर ठेवा— हात उचलताना श्वास घ्या आणि खाली करताना श्वास सोडा.
  • जर तुम्हाला कोणतीही अस्वस्थता जाणवली, तर थांबा आणि विश्रांती घ्या. हलक्या वजनाने प्रारंभ करा आणि तुमची शक्ती सुधारल्यावर हळूहळू वजन वाढवा.



लोअर लिंब स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज

Random Image
हिप फ्लेक्सिन

  • मजबूत खुर्चीवर सरळ बसून पाय जमिनीवर टेकवून ठेवा.
  • तुमची पाठ सरळ ठेवा आणि खांदे आरामदायक ठेवा. आधारासाठी खुर्चीच्या बाजूस हात ठेवा.
  • हळूहळू एक गुडघा तुमच्या छातीच्या दिशेने उचला, हे करताना पाठ सरळ ठेवा आणि पुढे वाकू नका.
  • १-२ सेकंदासाठी ही स्थिती ठेवा, नंतर हळूहळू पाय जमिनीवर परत ठेवा.
  • दुसऱ्या पायाने देखील हीच कृती करा.
  • प्रत्येक पायाने हीच कृती ८-१२ वेळा करा, २-३ सेट्स करा आणि सेट्समध्ये ३०-६० सेकंद विश्रांती घ्या.
  • हळूहळू गती वाढवा आणि श्वास नियमित ठेवा—उचलताना श्वास घ्या आणि खाली करताना श्वास सोडा.
  • जर तुम्हाला कोणतीही अस्वस्थता वाटली, तर थांबा आणि विश्रांती घ्या.
  • सुरुवातीला वजन न वापरता करा, आणि जर आरामदायक वाटत असेल, तर नंतर हलक्या वजनांचा वापर करू शकता.

Random Image
गुडघा वाकणे

  • मजबूत खुर्चीवर सरळ बसून पाय जमिनीवर टेकवून ठेवा.
  • तुमची पाठ सरळ ठेवा आणि खांदे आरामदायक ठेवा. आधारासाठी खुर्चीच्या बाजूस हात ठेवा.
  • हळूहळू एक पाय जमिनीवरून उचलून, तुमचा गुडघा सरळ करा आणि पाय जमिनीला समांतर करा.
  • नंतर हळूहळू गुडघा वाकवून पाय पुन्हा जमिनीवर ठेवा.
  • दुसऱ्या पायाने देखील हेच करा.
  • प्रत्येक पायाने हीच कृती ३–५ वेळा करा, २–३ सेट्स करा आणि सेट्समध्ये ३०–६० सेकंद विश्रांती घ्या.
  • सर्व क्रिया सावकाश करा आणि त्या करत असताना श्वास स्थिर ठेवा—गुडघा वाकवताना श्वास घ्या, आणि गुडघा सरळ करताना श्वास सोडा.
  • जर तुम्हाला कोणतीही अस्वस्थता वाटली, तर थांबा आणि विश्रांती घ्या.



उभे राहून करायचे ताकदीचे व्यायाम

Random Image
मिनी स्क्वॅट्स

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा. आवश्यक असल्यास, भिंतीला टेकून किंवा भक्कम खुर्ची किंवा टेबलवर हात ठेवून आधार घ्या.
  • हळूहळू गुडघे वाकवून खुर्चीत बसल्यासारखे खाली जा.
  • पाठ सरळ ठेवा आणि पायांवर वजन समानपणे ठेवा.
  • १-२ सेकंदांसाठी ही स्थिती ठेवा, नंतर हळूहळू पाय सरळ करून उभे रहा.
  • ३-५ पुनरावृत्त्या करा, २-३ सेट्स करा. सेट्समधील विश्रांती ३०-६० सेकंद घ्या.

Random Image
हिप अबडकशन

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
  • हळूहळू तुमचा पाय शरीरापासून शक्य तितका बाजूला न्या.
  • ही स्थिती १५ सेकंद ठेवा, नंतर हळूहळू पाय सुरुवातीच्या स्थितीत परत आणा.
  • प्रत्येक पायाने ३–५ पुनरावृत्त्या करा, २–३ सेट्स करा.
  • जर आरामदायक वाटत असेल, तर शेवटच्या पुनरावृत्तीनंतर ३० सेकंद स्ट्रेच करा.
  • सर्व क्रिया सावकाश करा आणि त्या करत असताना श्वास स्थिर ठेवा.
  • जर तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही हा व्यायाम दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या थेराबँडच्या सहाय्याने करू शकता. एक पिवळा किंवा हिरवा थेराबँड घ्या आणि त्याचे एक टोक एका मजबूत खुर्चीला बांधून, दुसरे टोक तुमच्या पायाच्या घोट्याला बांधून, आधी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करा. (हे थेराबँड मेडिकल/स्पोर्ट्स स्टोअर्समध्ये मिळतात.)

Random Image
हिप एक्सटेंशन

  • पायात थोडे अंतर ठेवून सरळ उभे रहा.
  • तुमचे गुडघे सरळ ठेवा आणि हळूहळू पाय मागे घ्या व हे करताना शरीर सरळ ठेवा.
  • ही स्थिती किमान १५ सेकंद ठेवा, नंतर हळूहळू सुरुवातीच्या स्थितीत परत आणा.
  • प्रत्येक पायाने ३–५ पुनरावृत्त्या करा, २–३ सेट्स करा.
  • सर्व क्रिया सावकाश करा आणि त्या करत असताना श्वास स्थिर ठेवा.
  • जर तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही हा व्यायाम दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या थेराबँडच्या सहाय्याने करू शकता. एक पिवळा किंवा हिरवा थेराबँड घ्या आणि त्याचे एक टोक एका मजबूत खुर्चीला बांधून, दुसरे टोक तुमच्या पायाच्या घोट्याला बांधून, आधी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करा. (हे थेराबँड मेडिकल/स्पोर्ट्स स्टोअर्समध्ये मिळतात.)

Random Image
भिंतीवर पुश-अप

  • भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे राहा.
  • तुमचे हात भिंतीवर खांद्याच्या उंचीवर ठेवा. दोन्ही हातांमध्ये खांद्यच्या रुंदी एवढे अंतर ठेवा.
  • हळूहळू तुमचे कोपर वाकवा आणि भिंतीकडे झुका, तुमचे शरीर सरळ रेषेत ठेवा.
  • भिंतीला दबाव देऊन सुरुवातीच्या स्थितीत परत जा.
  • तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा. टाचा उचलू नका.
  • ३–५ पुनरावृत्त्या करा, २–३ सेट्स करा.

को-ऑर्डिनेशन एक्सरसाइज



समन्वय व्यायाम का करतात?

जसजसे तुमचे वय वाढते तसे काही आरोग्याच्या समस्या येतात ज्यांचा तुमच्या स्थिर राहण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

संधिवात, अल्झायमर रोग, पार्किन्सन रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि हृदयविकार यांसारख्या वैद्यकीय परिस्थितीमुळे एखाद्याची संतुलित राहण्याची आणि मुक्तपणे हालचाल करण्याची क्षमता कमी होऊ शकते. या अस्थिरतेमुळेच शेवटी पडणे आणि त्यानंतर दुखापत होते

जुनाट आजारांव्यतिरिक्त, इतर कारणांमुळे ज्येष्ठांना पडण्याची अधिक शक्यता असते. यामध्ये दृष्टीदोष, औषधांचे दुष्परिणाम आणि शारीरिक तंदुरुस्ती कमी होणे यांचा समावेश होतो.हे समजण्यासारखे आहे की, व्यक्ती वयानुसार कमी सक्रिय होतात कारण त्यांच्या शरीराची दुरुस्ती होण्यास जास्त वेळ लागतो.

म्हणून, तुमचा समतोल आणि समन्वय सुधारण्यासाठी समन्वय-उन्मुख व्यायामामध्ये गुंतणे आवश्यक आहे.

किती वेळा करावे?

पाच पुनरावृत्ती, प्रत्येकी किमान 3 संच, दिवसातून किमान 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी


Image

को-ऑर्डिनेशनचे बसणे आणि उभे राहून करायचे एक्सरसाइज

Random Image
खुर्चीवर बसून उभे रहा

  • तुमचे हात मांडीवर किंवा छातीवर क्रॉस करून ठेवा.
  • हळूहळू पुढे झुका आणि तुमच्या पायांवर जोर देऊन उभे राहा.
  • एकदा उभे राहिल्यावर, तुमचा समतोल राखून १–२ सेकंद त्या स्थितीमध्ये थांबा.
  • हळूहळू आणि काळजीपूर्वक परत खुर्चीत बसा.
  • ८–१२ पुनरावृत्त्या करा, २–३ सेट्स करण्याचा प्रयत्न करा.
  • उभे राहिल्यावर, हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने परत बसा.

Random Image
अडथळयाची चाल

  • छोटे वस्तू जसे की कोन, पुस्तके किंवा पाण्याच्या बाटल्या इत्यादी इंग्रजी आठ आकड्याच्या आकारात जमिनीवर ठेवा, त्यामध्ये काही इंच अंतर ठेवा.
  • पायात अंतर ठेवून सरळ उभे राहा. आवश्यक असल्यास, आधारासाठी भक्कम खुर्ची किंवा भिंतीला पकडा.
  • हळूहळू पुढे चालायला सुरू करा, वस्तूंना ओलांडून पुढे जा आणि हे करताना तुमची पाठ सरळ ठेवा.
  • जेव्हा तुम्ही शेवटच्या वस्तूला पोहोचाल, तेव्हा वळा आणि त्याच मार्गाने परत या.
  • आरामदायक गतीने २–३ फेऱ्या (राऊंड्स) करा.

Random Image
एकमेकांना चेंडू पास करणे

  • भक्कम खुर्चीत सरळ बसा किंवा पायात अंतर ठेवून सरळ उभे राहा.
  • दोन्ही हातांनी हलके बॉल छातीच्या स्तरावर ठेवा.
  • हळूहळू बॉल एक हातातून दुसऱ्या हातात पास करा, तुमची हालचाल सहज आणि नियंत्रित ठेवा.
  • अधिक मजेदार करण्यासाठी, बॉल पास करताना तुमचे हातांमधील अंतर वाढवू शकता.
  • हे ३०–६० सेकंद किंवा प्रत्येक बाजूवर ८–१२ पुनरावृत्त्या करा.
  • २–३ सेट्स करण्याचा प्रयत्न करा.
  • हा व्यायाम सामूहिक क्रिया म्हणून देखील केला जाऊ शकतो.



हँडग्रिप सामर्थ्य सुधारण्यासाठी व्यायाम



बॉल बनवण्यासाठी स्पंज बॉल पिळून घ्या / कागदाचा बोळा करून तो दाबायचा प्रयत्न करा.
एक जाड टॉवेल घेऊन घट्ट पिळण्याची क्रिया करा



तुमच्या साप्ताहिक शारीरिक हालचालींची नोंद ठेवा आणि स्वयंमूल्यांकन करा


(A) बसून राहण्याची सवय (Sedentary Behaviour)
प्रश्न 1 2 3 4 5 गुण
तुम्ही दररोज किती वेळ बसून घालवता? (मोकळ्या वेळातील क्रिया, टीव्ही, संगणक, काम इ.) 5 तासांपेक्षा जास्त 4 ते 5 तास 3 ते 4 तास 2 ते 3 तास 2 तासांपेक्षा कमी
एकूण (A)
(B) क्रीडा आणि विरंगुळ्याच्या शारीरिक क्रिया (Sports and Recreational Activities)
प्रश्न 1 2 3 4 5 गुण
तुम्ही नियमितपणे एक किंवा अधिक शारीरिक क्रियांमध्ये सहभागी होता का? नाही होय
तुम्ही या क्रिया किती वेळा करता? महिन्यात 1 ते 2 वेळा आठवड्यातून एकदा आठवड्यातून 2 वेळा आठवड्यातून 3 वेळा आठवड्यातून 4 वेळा
सरासरी, प्रत्येक सत्रासाठी तुम्ही किती मिनिटे देता? 15 मिनिटांपेक्षा कमी 16 ते 30 मिनिटे 31 ते 45 मिनिटे 46 ते 60 मिनिटे 60 मिनिटांपेक्षा जास्त
या क्रियांमध्ये तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतात? (1 = खूप कमी, 5 = खूप जास्त) 1 2 3 4 5
एकूण (B)
(C) दैनंदिन शारीरिक क्रिया (Everyday Physical Activities)
प्रश्न 1 2 3 4 5 गुण
तुमच्या ऑफिसच्या किंवा इतर कामात किती शारीरिक हालचाल होते ? फारच कमी मध्यम प्रमाणात सरासरी जास्त खूप जास्त
तुमच्या नियमित कामाशिवाय, घरकाम/दुरुस्ती/बागकाम/स्वच्छता यासाठी आठवड्यात किती तास देता? 2 तासांपेक्षा कमी 3 ते 4 तास 5 ते 6 तास 7 ते 9 तास 10 तासांपेक्षा जास्त
तुम्ही दररोज किती मिनिटे चालता? 15 मिनिटांपेक्षा कमी 16 ते 30 मिनिटे 31 ते 45 मिनिटे 46 ते 60 मिनिटे 60 मिनिटांपेक्षा जास्त
तुम्ही दररोज किती मजले (पायऱ्या) चढता? 2 पेक्षा कमी 3 ते 5 6 ते 10 11 ते 15 16 पेक्षा जास्त
एकूण (C)
एकूण गुण = (A) + (B) + (C)


निकाल (Results)


तुमचा गुण १८ पेक्षा कमी असल्यास: तुम्ही फारशी शारीरिक हालचाल करत नाही, असा तुमचा प्रोफाइल दिसतो. जसं एखादी गाडी खूप दिवस गॅरेजमध्ये ठेवली तर ती गंजायला लागते, तसं तुमच्या शरीराचंही होतं. त्यामुळे तुम्हाला असंसर्गजन्य आजारांचा (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग, कर्करोग) आणि नैराश्याचा धोका अधिक असतो.
सूचना: दररोज शक्य तितक्या संधींमध्ये हालचाल करा—चालणे, सायकल चालवणे, घरकाम, छोट्या कामांसाठी बाहेर जाणे, बागकाम, मुलांसोबत खेळणे, कुत्र्याला फिरायला नेणे इत्यादी.

तुमचा गुण १८ ते ३५ दरम्यान असल्यास: छान! तुम्ही मध्यम प्रमाणात सक्रिय व्यक्ती आहात. तुमची शारीरिक हालचाल निरोगी जीवनासाठी सुचवलेल्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुमचे शरीर चांगल्या प्रकारे कार्य करते आणि असंसर्गजन्य आजार व नैराश्याचा धोका कमी होतो. असेच प्रयत्न सुरू ठेवा.
सूचना: प्रेरणा टिकवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते करण्याचा विचार करा (उदा. जलतरण, डोंगरावर चालणे, घरातील खेळ).

तुमचा गुण ३५ पेक्षा जास्त असल्यास: उत्कृष्ट! तुम्ही खूप सक्रिय व्यक्ती आहात. तुमची शारीरिक हालचाल तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच तुमची एकूण शारीरिक क्षमता सुधारते (उदा. हृदय व श्वसन क्षमता वाढणे, स्नायूंची ताकद वाढणे).

सूचना: सध्या जे करत आहात तेच सुरू ठेवा, पण अति करणार नाही याची काळजी घ्या!