वैद्यकीय विज्ञानात उल्लेखनीय प्रगती झाल्यामुळे जगभरातील लोक दीर्घायुष्याचा आनंद घेत आहेत. भारतात पण १३ कोटी पेक्षा जास्त लोक ६० वर्षे अथवा त्याहून जास्त वयाची आहेत. ही वेबसाईट 'निरोगी वृद्धत्व', 'आहार-विहार', शारीरिक व्यायाम, तसेच मानसिक आणि सामाजिक निरोगीपणाबद्दल मौल्यवान माहिती देऊन, व्यक्तींना कायम निरोगी, अधिक उत्साही व चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यासाठी समर्पित आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनाइटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने 'निरोगी वृद्धत्वाचे दशक (२०२१ ते २०३०)' सुरु केले आहे. हा जागतिक उपक्रम संपूर्ण वृद्धत्वाच्या प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिक आरोग्य, स्वातंत्र्य आणि जीवनाची एकूण गुणवत्ता राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रोत्साहन देते.
निरोगी वृद्धत्वाचे दशक (2021-2030) चे उद्दिष्ट आहे:
1. ज्येष्ठ नागरिकां प्रती सामाजिक दृष्टिकोन आणि वर्तन बदल.
2. ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या क्षमतांचे समर्थन करून त्यांना सक्षम करणे.
3. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वसमावेशक, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणे.
4. ज्येष्ठ नागरिकांसाठी दीर्घकालीन काळजी सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी निरोगी आणि आनंदी वृद्धत्वाला चालना देण्याच्या मिशनमध्ये योगदान देणे आवश्यक आहे!
चला एकत्र या प्रवासाची सुरुवात करूया!