Loading...
मराठी English

घरातील बदल

प्रवेशद्वार आणि आतील जिने, पॅसेज



हात रेलिंग्स
तात्पुरती रॅम्प
स्थायी रॅम्प


  • प्रवेश द्वार रुंद असावे, वॉकर किंवा व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्ती सहजतेने जाऊ शकतील.
  • प्रवेशद्वाराचा मार्ग मोकळा आणि अडथळा नसलेला असावा
  • मजबूत आणि स्थिर रेलिंग्ज असावीत. पायऱ्यांसाठी मजबूत हात रेलिंग्स असावीत.
  • गरजेनुसार लवचिक रॅम्प लावण्याची व्यवस्था, दीर्घकालीन वापरासाठी स्थायी रॅम्पची व्यवस्था करावी.

रहिवासाची जागा





  • राहण्याची जागा शक्यतो मोकळी, कमी फर्निचर असलेली असावी. कारण वयोवृद्ध लोक गजबजलेल्या ठिकाणी आदळण्याचा आणि पडण्याचा धोका असतो.
  • जमिनीवर लोम्बणाऱ्या तारा टाळाव्यात. लोंबकळणाऱ्या तारा व्यवस्थित बांधाव्यात..
  • जमिनीवर घसरणारे गालिचे किंवा चटई टाकू नयेत, कारण त्यामुळे घसरून पडण्याचा धोका असतो.

घसरण्याचा आणि पडण्याचा धोका

वायर आणि तारा लोंबकळत ठेवू नका.
घसरणाऱ्या चटया / गालिचे / कार्पेट्स ठेवू नका.


बाथरूम




  • बाथरूमकडे जाणारा मार्ग अडथळामुक्त असावा.
  • बाथरूमच्या जमिनीवर अँटी-स्किड मॅट्स लावाव्यात.
  • शौचालयाच्या आत आणि बाथरूम च्या आत पकडण्यासाठी जागो जागी हॅन्डल्स बसवावीत.



लाइटिंग




  • घरात पुरेसा प्रकाश असावा. समाज नसेल तर उत्तम प्रकाशयोजना होईल असे दिवे लावावेत
  • खोली पूर्ण अंधारी होणार नाही यासाठी फिकट रंगांचे पडदे लावावेत.
  • पायऱ्या आणि मार्गांवर स्कर्टिंग लाइट्स लावाव्यात. ज्यामुळे पायरी चढताना-उतरताना दिसेल आणि अपघात टळेल.
  • पॅसेज मध्ये खोलीतून दुसरीकडे जाणाऱ्या मार्गांमध्ये नाईट लॅम्प बसवावेत
  • अंथरुणाजवळ दिव्याचे बटन करून घ्यावे.

शयनकक्ष




  • झोपेच्या वेळी पडणे टाळण्यासाठी आणि बेडवरून उठताना आधार देण्यासाठी पलंगाची रेलिंग पलंगाला रेलिंग्ज लावावीत.

ऍक्सेसिबिलिटी




  • तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुमच्या घरात सहाय्यक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा म्हणून काही बदल करून घेऊ शकता. काठी सारखी साधी उपकरणे वापरण्यासाठी जागा असते परंतु व्हीलचेअर वरती बसून घरभर जावे लागले तर तशी व्यवस्था लागते. .
  • शक्य असल्यास, कमी उंचीचे (लोअर काउंटरटॉप) किचॅन ओटा आणि सिंक लावून घ्या. परंतु तो पर्याय नसल्यास, काउंटरटॉप म्हणून वापरण्यासाठी मोकळ्या जागेत कमी उंचीचे टेबल इत्यादी ठेवून वापरू शकता. कमी उंचीचे स्टोरेज कॅबिनेट, बुकशेल्व्ह, बॉक्स किंवा इतर जे काही तुम्ही प्राधान्य देता ते ठेवा. बॉक्सच्या बाहेर विचार केला कि गैरसोय टाळण्यास मदत होते!