Loading...
मराठी English

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य ही भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची एक संकल्पना आहे. मानसिक आरोग्य जीवनातील ताणतणावांना तोंड देताना, इतरांशी संबंध जोडताना आणि निवडी करताना एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणी, भावना आणि कृतीवर परिणाम करते. आपले मानसिक आरोग्य आपण कसे विचार करतो, जीवनातील विविध प्रसंग अनुभवतो आणि परिस्थिती नुसार कसे वागतो यावर परिणाम करते. जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची, नातेसंबंध निर्माण करण्याची आणि निर्णय घेण्याची आपली क्षमता आकार घेते ते मानसिक आरोग्यामुळेच. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते - आणि वयानुसार ते विशेषतः महत्वाचे राहते.

मेंदूचे आरोग्य देखील तितकेच आवश्यक आहे. चांगले कार्य करणारा मेंदू ज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसिक प्रक्रियांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमला समर्थन देतो, ज्यामध्ये शिकणे, स्मृती, निर्णय, भाषा आणि इतर अनेक कार्ये समाविष्ट आहेत. नंतरच्या काळात स्वातंत्र्य आणि जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी संज्ञानात्मक शक्ती म्हणजेच मेंदूचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे.

तथापि, उतारवयात मानसिक आरोग्य आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश यासारख्या परिस्थिती सामान्य आहेत परंतु अनेकदा वेळीच ओळखल्या नाहीत आणि उपचार झाले नाहीत तर समस्या वाढू शकतात. वेळेवर उपचार करून त्यामध्ये फरक पडू शकतो.

खालील लक्षणांकडे लक्ष द्या, जर :

  • मूड, रोजची ऊर्जा किंवा भूकेमध्ये लक्षणीय बदल
  • झोपेचा त्रास—किंवा जास्त झोप येणे
  • लक्ष केंद्रित करण्यास किंवा निर्णय घेण्यास त्रास
  • वाढलेली चिंता, विनाकारण ताण किंवा गोंधळ
  • वाढलेली चिडचिड, राग किंवा आक्रमकता

जर तुम्हाला किंवा तुमच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला ही लक्षणे जाणवत असतील, तर वाट पाहू नका— तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर मदत मिळाल्यास चांगले परिणाम मिळू शकतात आणि आरोग्य सुधारू शकते.

संज्ञात्मक कार्य (मेंदूचे कार्य) सुधारण्यासाठी उपाय:

विचारशील संवाद साधा!

चालू घडामोडी, राजकारण, क्रीडा, पर्यावरण, धोरणे, अर्थव्यवस्था आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करा. अशा चर्चांमुळे तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होते आणि टीकात्मक विचारशक्ती वाढते, ज्यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो.

ध्यानधारण करा!

दररोज दिवसाची सुरुवात ध्यानधारणेने करा. ध्यान हा मेंदूचा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे मन शांत होते, विचारांवर नियंत्रण मिळवता येते आणि भावनांना सावरण्याची क्षमता वाढते.

कला जोपासा!

कोणत्याही कला प्रकारात सहभागी व्हा, जसे की वाद्य वाजवणे, रेखाचित्र काढणे, विणकाम किंवा पेंटिंग, गाणे शिकणे, इत्यादी. कला आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरते, मन प्रसन्न ठेवते, विचार करण्याची क्षमता सुधारते आणि मेंदूचे संज्ञानात्मक कार्य अधिक मजबूत करते.

नवीन भाषा शिका!

नवीन भाषा शिकण्यामुळे भाषा कौशल्य, स्मरणशक्ती आणि टीकात्मक विचारशक्ती सुधारते. विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, नवीन भाषा शिकल्यामुळे स्मृतिभ्रंश (dementia) टाळण्यास मदत होते.

Image

Image

हिरवळीमध्ये चालायला जा!/ निसर्गाच्या सान्निध्यात चालायला जा!

जर तुम्हाला लांब चालण्यास अडचण नसेल तर निसर्गरम्य ठिकाणी, बागेमध्ये , मोकळ्या मैदानावर, बिल्डींग च्या आवारात फेरफटका मारा. असे चालणे मेंदूसाठी फायदेशीर असते कारण यामुळे सामाजिकता वाढते, स्वातंत्र्याची भावना मिळते आणि मनाला विश्रांती मिळते. चालताना झाडे, प्राणी आणि स्थानिक स्थळे निरीक्षण केल्याने स्मरणशक्ती वाढते.

Image

खेळ खेळा!

जिगसॉ पझल्स, सुडोकू आणि क्रॉसवर्ड यांसारखे खेळ खेळल्याने संज्ञानात्मक कौशल्य, एकाग्रता आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सुधारते. त्याच प्रमाणे वेगवेगळे कार्ड गेम, बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळ खेळ. हे खेळ मित्रांसोबत खेळल्यास सहकार्याने विचार करण्याची क्षमता देखील विकसित होते.

Image